पसायदान



आता विश्वात्मकें देवे येणे वाग यज्ञ तोषावे
तोषोनि मज द्यावे पसायदान हे ॥१॥

जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रति वाढो
भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे ॥२॥

दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्मसूर्ये पाहो
जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात ॥३॥

वर्षत सकळमंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी
अनवरत भूमंडळी भेटतु भूतां ॥४॥

चला कल्पतरूंचे आरव चेतनाचिंतामणीचे गाव
बोलते जे अर्णव पीयूषाचे ॥५॥

चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन
ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतु ॥६॥

किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनि तिहीं लोकी
भजिजो आदिपुरुषीं अखंडित ॥७॥

आणि ग्रंथोपजीविये विशेषीं लोकी इये
दृष्टादृष्टविजये होआवे जी ॥८॥

येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो होईल दानपसावो
येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला ॥९॥